अरबाज खान आणि मलायका अरोरा पुन्हा एकत्र आले, कारण ठरले खास

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा होती, मात्र चाहत्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. पण अलीकडेच अरबाज आणि मलायका मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत. दोन्ही स्टार्स त्यांचा मुलगा अरहान खानला घेण्यासाठी एकत्र दिसले. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खरतर, शुक्रवारी मलायका-अरबाजची मुलगा परदेशातून मुंबईत परतला, त्याला घेण्यासाठी दोघेही एकत्र विमानतळावर पोहोचले. मलायका अरोराने तिचा मुलगा अरहान खानला पाहून मिठी मारली. व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिचा मुलगा अरहानला बऱ्याच दिवसांनी भेटताना भावूक झाली. यासोबतच अरबाज मलायकाला मिठी मारून बोलतांनाही दिसला. पिता-पुत्राची ही बाँडिंग चाहत्यांना खूप आवडली. यादरम्यान मलायका राखाडी रंगाच्या जंपसूटवर ऑलिव्ह ग्रीन श्रग घातलेली दिसली, तर अरबाज ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये दिसला. तसेच, अरहान हिरवा लोअर आणि काळ्या हुडीसह काळी कॅप घातलेला स्मार्ट दिसत होता.

मलायका अरोरा आणि अरबाज खान खूप दिवसांनी एकत्र दिसले आहेत. घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायका यांच्यातील संबंध बिघडले नाहीत. दोघेही अनेकदा एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसले आहेत. यासोबतच आई-वडील दोघेही त्याचा मुलगा अरहानला खूप प्रोटेक्टीव करतात आणि अनेकदा त्याच्या आनंदासाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात.

मुंबई विमानतळावर मुलाला भेटल्यानंतर मलायका आणि अरबाज अरहानसोबत कारकडे जाताना दिसले. माहितीसाठी, या वर्षाच्या सुरुवातीला अरहान आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. जेव्हा अरहान शिक्षण पूर्ण करण्यासाठी देश सोडत होता. त्यानंतर मलायकानेही आपल्या मुलासाठी सोशल मीडियावर एक भावनिक चिठ्ठी लिहिली.

हे देखील पहा