टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

India vs Netherlands World Cup 2023:  वनडे विश्वचषक २०२३ मधील टीम इंडियाची विजयाची मालिका ९व्या सामन्यातही कायम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लीग टप्प्यात सलग 9 सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिली. यंदाच्या स्पर्धेतील  भारत हा एकमेव संघ आहेत ज्याने एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित एका बाबतीत सर्व भारतीय कर्णधारांच्या पुढे गेला.

टीम इंडियाने नेदरलँडचा पराभव करताच विश्वचषकातील सर्वाधिक सामने जिंकण्याचा स्वतःचा विक्रम मोडला. याआधी टीम इंडियाने 2003 वर्ल्ड कपमध्ये सलग 8 सामने जिंकले होते. तेव्हा टीम इंडियाची जादू सौरव गांगुलीच्या हातात होती. यासह रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये सलग 9 सामने जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे ज्याने विश्वचषकात सलग 9 किंवा त्याहून अधिक सामने जिंकले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर आहे. २००३ आणि २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलग ११-११ सामने जिंकून ट्रॉफी जिंकली होती. रोहितला या विक्रमाशी बरोबरी साधायची असेल तर त्याला आता उपांत्य आणि अंतिम सामनेही जिंकावे लागतील.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 4 गडी गमावून 410 धावा केल्या. श्रेयस अय्यरने १२८ धावांची नाबाद खेळी तर केएल राहुलने १०२ धावांची खेळी केली. तर, या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ केवळ 250 धावाच करू शकला.

महत्वाच्या बातम्या-

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी या योगासनांचा सराव करा, आयुष्यभर लागणार नाही चष्मा!

Beetroot Carrot Juice: गाजर आणि बीटरूटचा रस हिवाळ्यात आहे खूप फायदेशीर, जाणून घ्या त्याचे काही आश्चर्यकारक फायदे