सिंहगडजवळील गोऱ्हे खुर्द येथे भीषण अपघातात एक ठार तर तिघे गंभीर जखमी

किरकटवाडी : पुणे – पानशेत रस्त्यावरील (Pune – Panshet Road) गोऱ्हे खुर्द येथील शौर्य हॉटेलच्या (Shaurya Hotel) समोर वेगात असलेली कार उलटून अपघात (Car accident) झाला. यामध्ये भूषण रोहिदास किवळे (वय 25 रा. नांदोशी ता. हवेली) (Bhushan Kiwale) या तरुणाचा उपचारांपुर्वीच मृत्यू (Death) झाला असून इतर तिघे जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात (private hospital) उपचार सुरू आहेत.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, टोयोटाअर्बन क्रुझर (Toyota Urban Cruser) या चारचाकी गाडीतून भूषण व इतर तिघेजण पानशेकडून पुण्याकडे येत होते. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास वेगात असलेली कार गोऱ्हे खुर्द( Gorhe Khurd) गावच्या हद्दीत शौर्य हॉटेलच्या समोर उलटून अपघातग्रस्त झाली. या भीषण अपघाताचा आवाज ऐकून तेथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. गंभीर जखमी झालेल्या चौघांनाही उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु , दुर्दैवाने त्यापैकी भुषण किवळे या तरुणाचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाला आहे.