आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार

अयोध्या – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी त्याचा इन्कार केला आहे. हा दौरा राजकीय नसून श्रद्धेचा असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते.