आदित्य ठाकरेंच्या फेकाफेकीचा भाजपकडून भांडाफोड; ठाकरे गटाची झाली कोंडी

मुंबईत ४०० एमएम पाउस झाल्याचा आदित्य ठाकरेंचा जावईशोध

मुंबई  – आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुंबईत त्यांची सत्ता असताना तासाला ४०० एमएम पाऊस पडला असल्याचा केलेल्या दाव्यावर बोट ठेवत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंनी हा जावईशोध लावला कुठून? असा सवाल विचारला आहे. युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? असा सवालही त्यांनी केला आहे.

उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आमच्यावेळी ३०० एम एम पाऊस होवो अथवा ४०० एम एम. हे तासाला होतं. त्यावेळी मी किंवा महापौर वा उद्धव ठाकरे स्वतः रस्त्यावर जायचे. लोकांशी बोलायचे. काही गैरप्रकार असेल, असुविधा असेल, तर ती सोडवण्याचे प्रयत्न करायचे. काही अडचण असेल, तर ती सोडवण्याचे प्रयत्न करायचो असे आदित्य ठाकरे म्हणत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच विधानावरून आ. ॲड.आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

आ. ॲड.आशिष शेलार म्हणाले, ‘तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकमफाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल, मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली.’म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० एमेम पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो…! हा दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना. ‘इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!’, असा उपरोधिक टोलाही आ. ॲड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता’ अशी घणाघाती टीकाही आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

आयएमडीकडून २६ जुलै २००५ मुंबईत पडलेल्या पावसाची अधिकृत आकडेवारी (एम एम)

वेळ:१४.३० ते १५.३० पाऊस – १००.२

वेळ:१५.३० ते १६.३० पाऊस – १९०.३

वेळ:१६.३० ते १७.३० पाऊस – ९०.३

वेळ:१७.३० ते १८.३० पाऊस – १००.४

वेळ:१८.३० ते १९.३० पाऊस – ९५.०

वेळ:१९.३० ते २०.३० पाऊस – ७२.२

वेळ:२०.३० ते २१.३० पाऊस – ६०.२

वेळ:२१.३० ते २२.३० पाऊस – २२.५

वेळ:२२.३० ते २३.३० पाऊस – १८.४