एअरटेल ऑगस्टमध्ये 5G मोबाइल सेवा सुरू करणार, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक शहर कव्हर करण्याचे लक्ष्य

Mumbai –  Bharti Airtel देखील 5G ​​मोबाइल सेवा सुरू करण्यास तयार आहे. एअरटेल (Airtel) ऑगस्ट महिन्यातच 5G सेवा सुरू करणार आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की मार्च 2024 पर्यंत, भारती एअरटेल देशातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागात 5G मोबाइल (5G Mobiles)  सेवा सुरू करेल. 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्व 22 दूरसंचार मंडळांसाठी बोली लावणारा रिलायन्स जिओ 15 ऑगस्ट 2022 रोजी आपली 5G मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. असे संकेतही कंपनीने दिले आहेत.

एअरटेलचे एमडी सीईओ गोपाल विट्टल (Gopal Vittal) यांनी सांगितले आहे की एअरटेल ऑगस्टमध्येच 5G सेवा सुरू करणार आहे आणि मार्च 2024 पर्यंत देशातील प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात 5G सेवा सुरू करेल. देशातील 5,000 शहरांसाठी रोलआउट योजना तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे इतिहासातील सर्वात मोठे रोलआउट ठरेल. याआधीही त्यांनी सांगितले आहे की, एअरटेल आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करेल.

एकूण चार टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies)सात दिवसांच्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. ज्यामध्ये एकट्या रिलायन्स जिओचा वाटा ५९ टक्क्यांच्या जवळपास आहे. रिलायन्स जिओने 88,078 कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. रिलायन्स जिओनंतर भारती एअरटेलने सर्वाधिक स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.