जाणून घ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार शरद पवारांच्या घरी का पोहोचले?

Ajit Pawar at Sharad Pawar residence: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांनी शुक्रवारी (14 जुलै) प्रथमच त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेण्यासाठी दाखल झाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या काही तासांतच शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते जेथे शुक्रवारी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वृत्तानुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या हे प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.

.