राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली आहे; कालीचरण महाराजांचा राज ठाकरेंना फुल्ल सपोर्ट

सोलापूर – राज्यात सध्या भोंग्यांचा मुद्दा चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे यांना पाठींबा मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अनेक मशिदींमध्ये भोंग्या शिवाय अजान ( Ajaan without bells in mosques ) दिली जात आहे.

दरम्यान, यातच आता वादग्रस्त धर्मगुरू कालीचरण महाराजांनी राज ठाकरे यांना पाठींबा दर्शविला आहे.  कालीचरण महाराज हे सोलापूर दौऱ्यावर ( Kalicharan Maharaj on solapur tour ) आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली आहे असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले ( Kalicharan Maharaj About Raj Thackeray ) आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे, आणि त्याला संपूर्ण पाठिंबा आहे, असे कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj ) म्हणाले.

सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. 4 मे पासून मशिदी वरील भोंगे न उतरवले असता त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) लावा असे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. यावर कालीचरण महाराज यांनी राज ठाकरेंना संपूर्ण पाठिंबा असल्याची माहिती दिली व राज ठाकरेंनी खरी मर्दानगी दाखवली असे सांगितले. राज्यात लवकरात लवकर हिंदू हितेशी कायदे बनले पाहिजेत. असेही यावेळी ते म्हणाले.