अजित पवार बनले महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ‘या’ ९ नेत्यांनाही मिळाली मंत्रीपदे

मुंबई- आज राजभवन येथील दरबार हॉलमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Deputy Chief Minister Ajit Pawar) घेतली. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.

अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हात मिळवला आहे. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मगावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.