महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, आज अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Maharashtra New Deputy Chief Minister: महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फिरवणार आहेत, अशा चर्चा होत्या. मात्र आता शिंदे-फडणवीस यांनीच भाकरी फिरवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.