मोठी बातमी ! नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.

नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने कालच नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे कोर्टाबाहरे पडल्यानंतर जेव्हा गाडीत बसले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या गाडीला अडवलं होतं. यावेळी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता. पोलिसांनी