अजितदादांचा ऑन कॅमेरा थुंकणाऱ्या संजय राऊतांना महत्वाचा सल्ला, म्हणाले…

मुंबई – खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार केल्याने राऊतांच्या कृतीवर टीका होते आहे.

यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय राऊतांना मोलाचा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असे अजित पवार म्हणाले.