बालपणीपासूनच मिळाली नाही बापाची माया, नेमके का वेगळे झाले गौतमीचे आई-वडील? जाणून घ्या

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीच्या अदांवर अवघा महाराष्ट्र तर फिदा झालायच. पण जसजशी गौतमीची प्रसिद्धी वाढत आहे, तसतशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Who Is Gautami Patil Father) गाव कोणतं, तिचे वडील कोण, ते गौतमी पाटील सोबत का राहत नाही, किती वर्षांपासून ते विभक्त राहत आहेत? असे अनेक प्रश्न आहेत. आता याबद्दल तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोण आहेत गौतमीचे वडील?
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असे असून ते सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे या गावी राहतात. हेच गौतमीचे मूळ गाव आहे. तिच्या वडिलांच्या माहितीनुसार, जन्मानंतर काही दिवस गौतमी सुद्धा कुटुंबासह इथेच राहात होती पण नंतर ती मामाच्या गावाला म्हणजेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे आईबरोबर राहायला गेली. तर गौतमीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गौतमीच्या जन्माचं आधीच आई व वडील वेगळे झाले होते, आठवीत असताना गौतमीने पहिल्यांदा वडिलांना पहिले होते.

गौतमीने केलेल्या आरोपानुसार, तिचे वडील म्हणजे रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे पत्नीशी वाद व्हायचे यावेळी त्यांच्याकडून मारहाण झाल्याचे सुद्धा गौतमीने स्वतः सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गौतमीचे आई वडील विभक्त झाल्यावर वडिलांनी पुण्यात एकाठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली होती. यादरम्यान रवींद्र पाटील यांच्या पालकांचे निधन झाले व त्यावेळी गौतमी व तिची आई अंत्यसंस्कारांना आली नाही. या रागातून मागील साधारण २० वर्षे गौतमीची आई व वडील विभक्तच राहिले आहेत. सध्या गौतमीच्या वडिलांकडे त्यांच्या मूळ गावी घर व काही शेती आहे. याच शेतीतून ते आपला उदरनिर्वाह करतात.