लोकसभा हा तर ट्रेलर आहे… जाहीर झालेली उमेदवारी बदलावी लागल्याने दानवेंनी शिंदेंना डिवचलं

Hemant Patil | शिवसेना एकनाथ शिंदे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र भाजपाच्या दबावानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्याचे समजत आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला मारला आहे.

शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल हेमंत पाटील यांना बोलावण्यात आले होते. वर्षा बंगल्यावर अनेक तास चर्चा पार पडली. यावेळी हेमंत पाटील यांनी आपली बाजू ठामपणे मांडली. पण भाजपच्या दबावामुळे शिवसेनेला हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हेमंत पाटील यांना हा निर्णय मान्य नव्हता. अखेर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील यांना त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी दिली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर ते रात्री दोन वाजेच्या सुमारास वर्षा बंगल्यातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावरुन हेमंत पाटील यांना टोमणा मारताना अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपमध्ये गेले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव ठाकरेंवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. लोकसभा हा तर ट्रेलर आहे. विधानसभेत पूर्ण पिक्चर पहायला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती