राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच नेते – सुप्रिया सुळे

Supriya Sule – राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात एक उपुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. इंडिया आघाडीच्या बैठकीआधी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे.

आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पक्षफुटीवर देखील मोठं विधान केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना काहीही करून सत्तेत यायचं असतं,” असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट झाली नसल्याचा दावा केला.