सुझलॉन एनर्जीचा मोठा करार, चार महिन्यांत गुंतवणूकदार झाले मालामाल

Big contract to Suzlon Energy : सुझलॉन समूहाने इंटाग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरकडून 31.5 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवले आहे. मात्र, कंपनीने या कराराची किंमत जाहीर केलेली नाही. सुझलॉन समुहाने आज इंटाग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कडून ३१.५ मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचा करार जाहीर केला आहे, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. हा प्रकल्प मे 2024 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या कराराच्या वृत्तामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

सुझलॉन एनर्जीच्या समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी अपवादात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे. 27 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जीच्या एका शेअरची किंमत फक्त 7.00 रुपये होती, जी आज 22.30 रुपयांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे गेल्या चार महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे चौपट झाले आहेत.इंडिया टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.