‘भारतातले लोकं चंद्रावर जाण्यसाठी पैसे खर्च करत आहेत मात्र पाकिस्तानी लोकं तर आधीपासूनच चंद्रावर आहेत’

भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहचल्यावर पाकिस्तानी नागरिकाची प्रतिक्रिया

Chandrayaan 3 Landing – भारताने अ अंतराळात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वतःचा झेंडा फडकवणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर चांद्रयान-3 शी संबंधित पोस्टचा पूर आला आहे. आता, एका पाकिस्तानी नागरिकाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून भारताच्या चंद्रावरील मोहिमेवर भाष्य करताना त्याने पाकिस्तानच्या समस्या देखील मांडल्या आहे.

चांद्रयान-३ बद्दल बोलताना तो व्यक्ती म्हणाला, “वो पैसा लगा के जा रहे हैं ना, हम तो पहले से चांद पर रहे हैं [चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी ते पैसे खर्च करत आहेत, आम्ही आधीच चंद्रावर राहत आहोत]. त्यानंतर ती व्यक्ती चंद्र आणि पाकिस्तानमधील समानता दाखवते ज्यामध्ये पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत गरजा उपलब्ध नसल्याचा समावेश आहे. 23 ऑगस्ट रोजी शेअर केल्यापासून, व्हिडिओला 5.8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि संख्या अजूनही वाढत आहे.