विरोधीपक्षनेते पदावरुन हटवा, संघटनेत कोणतेही पद द्या; अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची तयारी सुरू

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे म्हटले. अजित पवार यांनी आता शरद पवारांसमोरच (Sharad Pawar) त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवा, अशी मागणी केली आहे. अजित पवार म्हणाले की, मला विरोधी पक्षनेता राहायचे नाही, पक्षात इतर कोणतीही भूमिका द्या, ती बजावायला तयार आहे.

‘मी विरोधी पक्षनेता म्हणून काटेकोरपणे वागत नाही, असे मला सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यात मला कधीच रस नव्हता पण पक्षाच्या आमदारांच्या मागणीवरून ही भूमिका स्वीकारली. त्यांच्या मागणीवर निर्णय घेणे हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अवलंबून असेल,’ असे अजित म्हणाले.

ते म्हणाले, ‘मला पक्ष संघटनेत कोणतेही पद द्या. माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, तिला मी पूर्ण न्याय देईन.’ महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडी सरकार कोसळल्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे हाती घेतली.