अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या निकालादरम्यान केले ‘हे’ लक्ष्यवेधी ट्विट 

लखनौ – उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवल्याबद्दल त्यांनी सपा कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मतमोजणी केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना दिले होते.

अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का …. मतगणना केंद्रों पर दिन-रात सतर्क और सचेत रूप से सक्रिय रहने के लिए सपा-गठबंधन के हर एक कार्यकर्ता, समर्थक, नेतागण, पदाधिकारी और शुभचितंक को हृदय से धन्यवाद! ‘लोकतंत्र के सिपाही’ जीत का प्रमाणपत्र लेकर ही लौटें!

दरम्यान, युपीमध्ये मतमोजणी सुरु असून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये समाजवादी पक्ष 82 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे. बसपा आणि काँग्रेस 5-5 जागांवर आघाडीवर आहेत.