America Cricket Team | अमेरिकेच्या संघाने इतिहास घडवला; पहिल्यांदाच केली ‘अशी’ कामगिरी

America Cricket Team | आईसीसी पुरुष टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत लॉडरहिलमध्ये झालेल्या कालच्या सामन्याच्या वेळी पावसाचा व्यत्यय आल्यामुळे अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला महत्वाचा सामना रद्द झाला. त्यामुळे अमेरिका संघांनं आपल्या कारकिर्दीच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपर आठ फेरीत प्रवेश केला आहे.

भारतानंतर अ गटातून पुढच्या फेरीत प्रवेश करणारा अमेरिका (America Cricket Team) हा दुसरा संघ ठरला आहे. पूर्व विजेता पाकिस्तान संघ आणि आयर्लंड हे सुपर आठ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आज, भारताचा शेवटचा गट सामना कॅनडाशी होणार असून, भारतीय प्रमाण वेळेनुसार फ्लोरिडा मधल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर रात्री 8 वाजता सामना सुरू होईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप