रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या भेटीचे वृत्त खोटे, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray Wife) पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray) भेटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्द केले आहे. हे वृत्त निराधार आणि धादांत खोटे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही, अशी माहिती खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही. लोकांना खरी माहिती देण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमांनी खोट्या सूत्राचा आधार घेणे अपेक्षित नाही. त्यातून माध्यमांचीच विश्वासार्हता धोक्यात येते, हे ध्यानात घ्यावे, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.

तसेच खुद्द एकनाथ शिंदेंनीही ट्वीट करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

https://youtu.be/dAPyVdU4m2M