‘जरांगे स्वतःच कन्फ्यूज आहे की मराठा म्हणून घ्यायचं आहे की कुणबी म्हणून घ्यायचं’

Manoj Jarange Patilअंतरवली सराटी येथे भगवे वादळ पाहायला मिळाले. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले होते. यावेळी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यासोबतच जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील घणाघाती टीका केली.

दरम्यान, या टीकेला सदावर्ते (Gunaratna Sadavrte) यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, जरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही. कारण जरांगे हे त्यांच्या पॉलिटिकल बॉसच्या आधारावर बोलतात, असा निशाणा सदावर्ते यांनी साधला.अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता. महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही, असा पुनरुच्चार अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

आज आपण जर बघितलं असेल तर जरांगे काही काळ मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या, असं म्हणाले. थोड्या वेळानंतर म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्या. म्हणजे त्यांनाच माहिती नाही आरक्षण कुठल्या प्रवर्गातून हवंय. जरांगे रानभुल लागल्यासारखं बोलत होते. जरांगे स्वतःच कन्फ्यूज आहे की मराठा म्हणून घ्यायचं आहे की कुणबी म्हणून घ्यायचं आहे. पण दोन्ही जरी मागणी केल्या तरी मला हेच म्हणायचं आहे की दोन्ही मागणीला महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणास पात्र ठरत नाही. तीन आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय, असा पुनरुच्चार सदावर्ते यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचा इशारा

मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील

मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा