Amit Shah | विरोधी पक्षांच्या आघाडीची बिहारला पुन्हा जंगलराजकडे नेण्याची इच्छा आहे

Amit Shah | लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आता पाचच दिवस राहिले असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभा, उमेदवारांच्या पदफेऱ्या, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी यांना चांगलाच वेग आला आहे.

भाजपाचे वरीष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजस्थानमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या. भविष्यातल्या गरजांनुसार पायाभूत विकास करणाऱ्या एका स्थिर सरकारची देशाला गरज आहे. युवा पिढीच्या स्वप्नांना समजून घेणारं तसंच महिला, शेतकरी, गरीब, आदिवासी, शोषित, मागासवर्ग यांची काळजी घेणारं सरकार जनतेला हवं आहे असं मोदी या सभेत म्हणाले.

भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालमधे प्रचारसभा घेतल्या. पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत अल्पसंख्यक समाजात चुकीची माहिती पसरवली जात आहे असे आरोप त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर केले. तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप बालुरघाट इथल्या प्रचारसभेत केला.

विरोधी पक्षांच्या आघाडीची बिहारला पुन्हा जंगलराजकडे नेण्याची इच्छा आहे अशी टीका अमित शहा (Amit Shah) यांनी बिहारमधल्या प्रचारसभेत केली. भाजपा प्रणित आघाडीच बिहारला विकासाकडे नेऊ शकते असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. भाजपाचं बोलणं आणि कृती यात खूप मोठं अंतर असल्याचा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रचारसभेत केला. भाजपाच्या स्थिर सरकारमुळे गेल्या 10 वर्षात तिहेरी तलाक पद्धत रद्द करणं, अयोध्येत राममंदिराची उभारणी यासारख्या गोष्टी शक्य झाल्या असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 तारखेला केरळमधल्या 20, कर्नाटक 14, राजस्थान 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातल्या 7, आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी 3 तसंच त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन