Uday Samant Car Attack | उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक; उद्योग मंत्री म्हणाले, “हा हल्ला….”

Uday Samant Car Attack | लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीदरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. वाशिम-यवतमाळ महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी जात असताना वाटेत अज्ञातांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक केली. सुदैवाने उदय सामंत या गाडीत (Uday Samant Car Attack) नव्हते. या दगडफेकीत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे.

या घटनेवरुन उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी मी राळेगावमध्ये असताना, मी ज्या गाडीमध्ये बसणार होतो त्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे गाडीची काच फुटली. ही बातमी मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री केली, तेव्हा हा प्रकार घडलेला होता. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही, मी सुद्धा या गाडीत नसल्याने सुखरूप आहे, अशी माहिती त्यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली.

तसेच ते पुढे म्हणाले, हा अनुभव मला काही नवीन नाही कारण पुण्यामध्येही अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर झाला होता. परंतू हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेलं नाही. दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलीसांकडे देण्यासाठी मी माझ्या चालकास पाठवले आहे, असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन