Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Sunil Tatkare – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अल्पसंख्याक समाजासाठी केलेले काम, नारी शक्तीसाठी घेतलेले निर्णय, केलेल्या पायाभूत सुविधा… व इतर महत्वपूर्ण निर्णय लक्षात घेता सध्या विरोधकांकडील प्रचाराचे मुद्दे संपल्याने विरोधकांनी संविधान बचाव नावाने ओरड सुरू केली असून प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केली. महायुतीच्या अलिबाग शहर कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

संविधान बचावच्या नावाने वातावरण दुषित केले जात आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे. देशाला विकासाच्या प्रगतीपथावर कोण नेत आहे याची जाण जनतेला आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम आपण घराघरात पोचवायचे आहे. भविष्यात नविन मतदारांना मतदानासाठी आणावे लागेल आणि त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अर्ज दाखल करताना ‘जिंकायचेच’ या उत्स्फुर्तपणे महायुतीचे लोक आले होते त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी कौतुक करतानाच आता कुणीही गाफील राहू नये. सतर्कने घराघरात घड्याळ हे चिन्ह पोचवायचे आहे. ग्रामीण भागात आपली पकड घट्ट आहे परंतु शहरात आपल्याला ताकदीने काम करावे लागणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा