Loksabha Election | अब की मोदींचा ४०० पारचा फुगा फुटणार, एलन मस्कने सत्ताबदलाच्या कारणामुळे भारत दौरा लांबणीवर टाकला

Loksabha Election |जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क ( Elon Musk) यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे असे प्रतिपादन माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गाडगीळ म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय (Loksabha Election) परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधीत देशात सत्तेवर कोणते सरकार असणार हा ही एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो. असे असताना टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे याचाच अर्थ भारतात निवडणूकांनतर सत्तापरिवर्तन होणार आहे याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातल्या जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे असे गाडगीळ म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन