औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्या ओवेसींना अमोल कोल्हेंनी झापलं, म्हणाले…

पुणे – काल एमआयएमचे नेते  अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या(Aurangabad) दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण(Waris Pathan) आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे. औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्याने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Ncp Mp Amol Kolhe) यांनी ओवेसी यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले की, ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय.

अमोल कोल्हे म्हणाले की, आज एक हैदराबादचे(Haydrabad) महाशय औरंगाबादमध्ये आले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांचे हाल केले. ज्याने सख्ख्या भावंडांची कत्तल केली. त्या माणसाचं उदात्तीकरण करून तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचे अंगरक्षक हे मुस्लिम होते. तेंव्हा अठरा पगड जातीचे सगळे एकत्र आले, ते स्वाभीमानासाठी. रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी. तेंव्हा असं वागा की, माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेंव्हा अशी भावना बळावते तेंव्हा कोणत्याही अतिरेकी वंश वादावर जातो, तेंव्हा तो राष्ट्र कधी टिकत नाही. जर्मनी, अफगाणिस्तान याची जिवंत उदाहरणे आपल्या समोर आहेत. तेंव्हा हातात येणारा दगड कोणत्या कामासाठी वापरतो, हे महत्त्वाचं. एक दगड समाज जोडू शकतो, अन् तो विकास कामासाठी वापरला तर तो दगड समाजाच्या वापरासाठी येतो.