उद्धव ठाकरेंच्या सभेचं मला निमंत्रण मिळालं आहे; पण मी जाणार नाही :  कदम

मुंबई : हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने (shivsena) कार्यकर्त्यांना साद घातली आहे. येत्या 14 तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानात (BKC ground)  शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray)  आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS president Raj Thackeray) भोंग्यांचा मुद्दा (Loudspeaker Issue) घेत महाविकास आघाडी (MVA) आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा (Polkhol Sabha) घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि  शिवसेना सज्ज झाली आहे.

दरम्यान,   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप मला मिळालाय. शिवसेनेच्या (shivsena) ता. १४ मे रोजीच्या सभेचे बोलावणं मला आल्याची जाहीर कबुली शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. मात्र, मी त्या सभेला जाणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे रामदास कदमांनी स्पष्ट केलं.  शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला १४ मे रोजीच्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणं आलं आहे. मात्र, त्या सभेला मी उपस्थित राहणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं रामदास कदम यांनी सष्ट केलं. गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा निरोप रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याजवळ दिला आहे.