Asia Cup: भारताने मिळवले फायनलचे तिकीट, पाकिस्तानलाही मिळेल का प्रवेश? जाणून घ्या गणित

India vs Pakistan, Asia Cup 2023 Final: आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाचा शानदार प्रवास सुरूच आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली संघाने सुपर-4 फेरीत पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही पराभूत केले आहे. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमांचक झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने 41 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल. पण त्याआधी भारतीय संघाला सुपर-4 मधील तिसरा आणि शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 15 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल होऊ शकते

अंतिम फेरीत भारतीय संघ पाकिस्तानशी पुन्हा एकदा भिडू शकतो. वास्तविक, आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत आता फक्त दोनच सामने शिल्लक आहेत. भारत-बांगलादेश सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाशी सामना करेल. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाल्यास काय होईल?

पण जर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. जर सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांच्या नेट रन रेटवरुन निकाल लावला जाईल. या स्थितीत श्रीलंका जिंकून सहज अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण श्रीलंका संघाचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=0qtW1pIMZiZwogoI

महत्वाच्या बातम्या-
कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा; धनंजय मुंडेंचे निर्देश
फडणवीस ,बावनकुळे यांचा अवमान केला तर त्याच भाषेत उत्तर देऊ, चित्रा वाघ यांचा इशारा