सलमानच्या चित्रपटात अवघ्या 50 रुपये मानधनावर काम करणारा कलाकार मालिका विश्वात सुपरस्टार झालाय

भावना संचेती – मालिका असो वा सिनेमा मुख्य हीरो म्हटलं की एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे उंच , गोरा – गोमटा , पिळदार शरीर सो कॉल्ड भाषेत सांगायचं तर चॉकलेट बॉय पण थोडी कमी ऊंची , ना पिळदार शरीर किंवा  चॉकलेट हिरोसाठी लागणारी कोणतीही गोष्ट  नाही , तरीही  फक्त आणि फक्त कसदार अभिनय (Acting)आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर एक व्यक्ती मालिका विश्वात सुपरस्टार बनतो, तो व्यक्ती म्हणजे तारक मेहता का उलटा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सब टीव्हीवर (SAB TV) लोकप्रिय मालिकेतील जेठालाल चंपकलाल गडा होय.

जेठालाल  हे जरी त्याचे मालिकेतील नाव असले तर या अभिनेत्याचे खरे  नाव आहे दिलीप जोशी (Dilip Joshi).  दिलीप यांना दिलीप नावाने फार कमी लोक ओळखतात पण त्यांना खरी ओळख दिली ती जेठालाल (Jethalaal) या पात्राने. दिलीप  यांनी या मालिकेआधी अनेक चित्रपटात (Movies) काम केले आहे पण सर्वांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे टप्पू के पापा होय. दिलीप यांना या स्थानापर्यत पोहचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. अवघ्या 50 रुपयांच्या मानधनावर त्यांनी त्याच्या करियरला सुरुवात केली होती .

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मैने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी त्याच्या अभिनयांच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटांत त्यांनी रामु नोकरांची भूमिका केली होती. 1989 रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट देखील झाला. दिलीप यांची भूमिका लहान होती पण ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. यानंतर मात्र दिलीप   यांनी मागे वळून पहिले नाही. या नंतर अनेक यश अपयश  पचवत दिलीप  आपले काम करत राहिले.

या नंतर पुन्हा त्यांनी  सलमान खान सोबत हम आप है कौन या चित्रपटात देखील काम केले.  चित्रपट या माध्यमापूरते मर्यादीत न राहता दिलीप यांनी 1995 साली छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळविला तेथे त्यांनी कभी ये कभी वो”  ही मालिका केली त्या नंतर ‘हिन्दुस्तानी’, ‘खिलाड़ी ४२०’, हमराज  यासारख्या चांगल्या सिनेमात देखील काम केले. त्यांना खरा मोठा ब्रेक मिळाला तो सब वाहिनीवरील 2008 साली आलेल्या तारका मेहता या विनोदी मालिकेत.

या मालिकेत त्यांना जेठालाल ही गुजराती व्यापाऱ्यांची भूमिका मिळाली. दिलीप  यांनी या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आणि मालिका सुपर हीट ठरली. अजून देखील ही मालिका सुरू आहे. या मालिकेच्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील नोंदविले गेले आहेत. सर्वाधिक काळ चालणारी मालिका हा देखील रेकॉर्ड त्यापैकी एक आहे. दिलीप  यांना दोन वेळा  इंडियन नॅशनल थिएटरकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्या्चा पुरस्कार देखील मिळाला आहे. दिलीप   तारका मेहता या मालिकेसाठी 25 दिवस शूटिंग करतात त्यांना यासाठी 12 -13 लाख इतके मानधन मिळते. अवघ्या 50 रुपये मानधनावर काम करणारा कलाकार जेव्हा लाखों रुपये कमावतो ते फक्त आणि फक्त दोन गोष्टीच्या आधारावर एक म्हणजे जिद्द आणि दुसरी म्हणजे चिकाटी