नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक झाली, ठिणगी टाकून जातीचं राजकारण पेटवलंच का नागपूरच्या कलंकने?

Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पवारांवर सततचे आरोप केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.

दरम्यान, पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता.

या घडामोडींवर राजकीय नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील (Ayodhya Paul Patil) यांनी देखील आपली प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक झाली, ठिणगी टाकून जातीचं राजकारण पेटवलंच का नागपूरच्या कलंकने? अरे कुठे नेऊन ठेवलाय #महाराष्ट्र माझा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रतिक्रियेनंतर अयोध्या पौळ पाटील यांना अनेकांनी ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-