APMC Election : नाथाभाऊंना मोठा धक्का; भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा मोठा विजय  

Bajar Samiti Election Result  : येत्या जिल्हा परिषद निवडणुकींची ‘ट्रायल रन’ ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठे प्रस्थापितांना धक्का, तर कुठे नवख्यांना संधी, असे चित्र आहे. मतदारांनी नेत्यांच्या मागे जाण्यापेक्षा जे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या योग्यतेचे उमेदवार आहेत, अशांनाच संधी दिल्याचे निकालानंतर दिसत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असली तरीही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भुसावळ बाजार समितीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व माजी आमदार संतोष चौधरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.