बाबरी पाडताना मी तिथेच होतो, १८ दिवस मी तुरुंगात होतो – देवेंद्र फडणवीस 

मुंबई – मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर (Somaiya Maidan) जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले.या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचे मुख्य भाषण झाले. या भाषणाची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे. या वेळी बोलताना आपण स्वत: बाबरीचं पतन झालं तेव्हा तिथे असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. तसेच एक कारसेवक म्हणून आपण १८ दिवस तुरुंगामध्ये होतो असंही फडणवीस म्हणालेत.

बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलंय.

मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.