दोन दिवसाच्या आत श्रीकांत देशमुखला अटक करा अन्यथा राष्ट्रवादी युवक कडून आंदोलन करू – चव्हाण

सोलापूर : हनीट्रॅपमध्ये अडकलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूर (Solapur) (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. नुकताच देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार श्रीकांत देशमुख यांच्याकडे होता. बेडरुममधील व्हिडिओ आणि तक्रारींनंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख (Vikram Deshmukh) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, सोलापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षने महिलेसोबत संबंध ठेऊन फसवणूक केली आहे. त्या महिलेने रीतसर तक्रार केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे दोन दिवसाच्या आत या नराधमाला अटक करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कडून आंदोलन करण्यात येईल.असं त्यांनी म्हटले आहे.