काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल..एकदम ओके… गुवाहटीमध्ये सुद्धा व्हायरल बापुंचीच चर्चा 

गुवाहाटी – काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल..एकदम ओके… हे वाक्य माहित नसणारा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shiv Sena’s Sangola MLA Shahaji Patil) यांच्या या वाक्याने अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलंय.आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुवाहटी मध्ये बसलेल्या आमदारांमध्येही शहाजी बापूंच्या व्हायरल डायलॉगचीच (Viral dialogue) चर्चा रंगलीय.

आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंचे मनापासून कौतुक केलं. यावेळी शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झालय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं.