पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ११ ऑक्टोबर पासून आयोजन !!

Pune Cricket –  क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी (Cricket Next Academy) तर्फे पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ (Knock 99 trophy) अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ११ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि संयोजक विक्रम देशमुख यांनी सांगितले की, जागतिक करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा ५ ऑक्टोबर पासून ही रोमहर्षक स्पर्धा भारतामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे सगळेच वातावरण हे क्रिकेटमय झाले आहे. यामुळे केवळ क्रिकेट पाहून आनंद घेण्यासोबतच क्रिकेट खेळून वर्ल्ड कप साजरा करूयात, असा आमचा मानस आहे. स्पर्धेला सुजनील आणि महाराष्ट्र प्रिमिअर लीग या स्पर्धेतील पुणेरी बाप्पा संघ या दोघांनी पाठींबा दिला आहे, यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.

सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई म्हणाले की, युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव आणि संधी देण्यार्‍या नॉक-९९ करंडक स्पर्धेचा एक भाग होण्यामध्ये आम्हाला आनंद होत आहे. टॅलेंटचा शोध घेणार्‍या अशा १९ वर्षाखालील स्पर्धा खेळाडूंसाठी महत्वाच्या असतात आणि अशा स्पर्धेमध्ये आमच्या सुजनीलचा आणि पुणेरी बाप्पा यांचा हातभार लागल्याचे आम्हालाही समाधान आहे.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या टी-२० स्पर्धेत आयोजक क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, २२ यार्ड्स क्लब, सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रीलियंट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, अगस्त्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी, व्हिज्डम क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, कोद्रे फार्म क्रिकेट अ‍ॅकॅडमी, श्री समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पीआयओसी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ट्रीनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एनएसएफ क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एमसीव्हीसीएस क्रिकेट अ‍ॅकॅडमी (Cricket Next Academy, 22 Yards Club, Century Cricket Academy, Aryans Cricket Academy, Brilliants Cricket Academy, Agastya Cricket Academy, Wisdom Cricket Academy, Spark Cricket Academy, Kodre Farm Cricket Academy, Shree Samarth Cricket Academy, PIOC Cricket Academy, Trinity Cricket Academy, CSR Cricket Academy, NSF Cricket Academy, Pune Cricket Academy, MCVCS Cricket Academy) संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

विक्रम देशमुख पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षिस व करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई आणि महाराष्ट्रीय मंडळ याचे सहकार्यवाह आणि पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार रोहन दामले यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचा सलामीचा सामना सेंच्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि २२ यार्ड्स अ‍ॅकॅडमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया