लाट आली अन् बापसह दोन मुलांना घेऊन गेली; सांगलीतील तिघे समुद्रात बुडाले

ओमान – ओमान येथील मुघसाईल समुद्रामध्ये जत मधील तिघे जण वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तिघे जण हे मुळचे जत येथील आहेत. अभियंता शशिकांत म्हमाणे असे त्या पित्याचे नाव असून त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे.

मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील कित्येक वर्षांपासून दुबई (Dubai)येथील एका कंपनीत कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान (Oman) या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

समुद्र किनाऱ्यावर जाण्यापूर्वीचे त्यांचे आनंदी व उत्साहातील व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहे. सहलीसाठी गेलेले हे सर्व टीम सोबत दिसत आहेत. ओमान येथील सलालाहा या समुद्रकिनारी प्रचंड लाटा उठत असताना त्या ठिकाणी ते गेले. यावेळी झालेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये प्रचंड मोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळताना दिसत आहे. यातच एक मोठी लाट उसळल्यानंतर काहीजण समुद्रामध्ये ओढले गेल्याचं ते दिसत आहे. त्यामध्ये लहान दोन बालके पाण्यामध्ये वाहून गेलेली दिसत आहेत.दरम्यान, या दुर्घटनेत पत्नी सारिका व एक मुलगी बचावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे जतमध्ये शोककळा पसरली आहे.