राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच मनसे तयारीला लागली; ठिकठिकाणी पोस्टर्सबाजी

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे काल पुणे दौऱ्यावर होते . शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्यानंतर राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे (May 1) रोजी मी औरंगाबाद (Aurangabad) येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसे तयारीला लागली आहे. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भगवी शाल पांघरलेला फोटो असून बाजूला राजतीलक की करो तयारी आ रहा है भगवा धारीअसा उल्लेख बॅनर वर करण्यात आला आहे.