बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल तर त्या मिठाला जागा, महाराष्ट्राची बदनामी करू नका – सुळे

इंदापूर – नवीन उद्योगांची उभारणी (Establishment of new industries) करण्यासाठी  महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा (Central Government Data) सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी विरोधकांना दिला आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात तुम्हाला भाषण करायचे आहे तर तुम्ही जरूर करा, पण आम्हाला काम करू द्या. भाषण करून तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही आपली फक्त बदनामी होणार आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही मराठी मराठी करता जर खरंच मराठीवर एवढं प्रेम असेल,  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर (Balasaheb Thackeray)  प्रेम असेल आणि त्या मिठाला जागा, महाराष्ट्राची बदनामी करू नका असा सबुरीचा सल्ला देखील सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिलाय.  खासदार सुप्रिया सुळे इंदापूरमध्ये (Indapur)  विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेस त्या बोलत होत्या.