एकदा ‘दिशा’ चुकली की दाही दिशा फिरावे लागते; शिंदे गटानंतर भाजपनेही आदित्य ठाकरेंना घेरले

Mumbai – विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने बॅनर, घोषणांचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ असा बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष 2014 मध्ये 151 चा हट्ट करत युती बुडवली, 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा होती. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, भाजपानेही आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.  युवराजांची कायमच दिशा चुकली’ असे पोस्टर हातात घेऊन शिंदे गटाची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. एकदा  दिशा चुकली की दाही दिशा फिरावे लागते असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.