Newsclick Raid : न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक, ४६ जणांची चौकशी

Prabir Purkayastha arrested in Newsclick funding case: दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (३ ऑक्टोबर) डिजिटल न्यूज वेबसाइट न्यूजक्लिकच्या फंडिंग प्रकरणात त्याचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक केली. अधिका-यांनी सांगितले की, पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालय सील केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती या दोन आरोपींना स्पेशल सेलमध्ये नोंदवण्यात आलेल्या UAPA प्रकरणाच्या संदर्भात छापेमारी, जप्ती आणि कोठडीच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. एकूण 37 पुरुष संशयितांची चौकशी करण्यात आली तर 9 महिला संशयितांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. या कालावधीत, डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे इत्यादी तपासासाठी जप्त/संकलित करण्यात आली आहेत.( Newsclick Raid)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी सकाळी न्यूजक्लिक आणि त्याच्याशी संबंधित पत्रकारांच्या घरावर दहशतवादविरोधी कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात छापे टाकण्यास सुरुवात केली होती. ज्या पत्रकारांच्या घरी पोलीस पोहोचले त्यात भाषा सिंग, अभिसार शर्मा, उर्मिलेश, अनइंड्यो चक्रवर्ती आणि परंजय गुहा ठाकुर्ता (Bhasha Singh, Abhisar Sharma, Urmilesh, Anindyo Chakraborty and Paranjay Guha Thakurta) यांचा समावेश आहे.

सरकार काय म्हणाले?
या छाप्यावरील विरोधकांच्या टीकेबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भुवनेश्वरमध्ये सांगितले की, देशाच्या तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत आणि त्या कायद्यानुसार काम करतात.

ते म्हणाले,  र कोणी काही चुकीचे केले असेल, तर तपास यंत्रणा त्या संदर्भात काम करते. जर तुम्ही बेकायदेशीरपणे पैसे घेतले असतील किंवा काही आक्षेपार्ह केले असेल तर तपास यंत्रणा त्याची चौकशी करू शकत नाही, असे कुठेही लिहिलेले नाही.

प्रेस क्लब ऑफ इंडियाने काय म्हटले?
प्रेस क्लब ऑफ इंडिया (पीसीआय) ने सोशल मीडियावर सांगितले आम्ही घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि तपशीलवार निवेदन जारी करू. पीसीआयने सांगितले की, आम्ही पत्रकारांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि सरकारने यासंदर्भात सविस्तर माहिती देण्याची मागणी केली आहे.

काय आहे आरोप?
चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर न्यूजक्लिकवर ही कारवाई करण्यात आली आहे. भारतातील चीन समर्थक प्रचारासाठी अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम (Neville Roy Singham) यांच्याकडून कथितपणे पैसे घेतल्याबद्दल ही वेबसाइट अलीकडेच चर्चेत होती.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil