‘तिला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर…’, स्वरा भास्करच्या लग्नाबाबत महंतांचं वादग्रस्त भाष्य

Mumbai: राजकीय विचारांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) सध्या तिच्या लग्नामुळे प्रकाशझोतात आली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. लग्नाच्या ४० दिवसांनंतर तिने सर्वांना याबद्दल माहिती दिली आहे. स्वरा आणि फहाद यांच्या लग्नावरुन विविध प्रतिक्रिया पुढे येत आहेत. यादरम्यान आता अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी स्वराच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“स्वराला भविष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मी तिला अल्टिमेटम देतो की तिने ज्या जातीत लग्न केलं आहे, त्यात बहिणीसोबतच लग्न केलं जातं. त्यानंतर महिलांना तीन तलाकच्या नावावर अनेक पुरुषांसोबत रात्र घालवावी लागते”, असं महंत राजू दास म्हणाले.

“जर स्वराला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर तिला लग्नाच्या शुभेच्छा. पण जर ती खरंच नारी शक्ती असेल तर तिला लग्न करायला पाहिजे नव्हतं. आता जर तिने लग्न केलंच आहे तर तिचं स्वागत आहे. सनातन धर्मावरून एक ओझं कमी झालं”, असंही ते पुढे म्हणाले.