महाविकास आघाडीला झटका; हितेंद्र ठाकूरांची तीन मते भाजपकडे जाणार

मुंबई – राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार बनली आहे.(rajya-sabha-elections) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली असून शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. आज सकाळी मविआचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पहिला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची टांगती तलवार असल्याने बविआ भाजपला (BJP) मतदान करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.