प्रणिती शिंदे जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलितांवर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता?

नांदेड – सोलापूर येथील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांच्यावर टीका केली होती, त्याला जोरदार प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीकडुन देण्यात आले.

जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही कुठे लपला होतात? त्यावेळी आम्हीच लढत होतो.

काँग्रेस पक्षाने दलित आमदारांना वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्यापूरते सोडले आहे. जेव्हा देशभर अल्पसंख्याकांवर अन्याय होत होते, तेव्हा तुमचे वडील सुशीलकुमार शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेजवर होते.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आपण किती कोटी रुपयांची संपत्ती दक्षिण आफ्रिका येथे गुंतवली आहे?? याचा हिशोब देणार आहात का?  यापुढे वंचित बहुजन आघाडी आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलतांना भान राखून बोलायचे, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले.