अनिल गोटेंवर राष्ट्रवादी पक्ष, गृहमंत्री, महिला आयोग काय कारवाई करणार ?

पुणे – काशी विश्वेश्वराच्या मंदीराचा जीर्णोद्धार करुन हिंदु धर्म ज्यांनी राखला अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आणि राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये, राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी अत्यंत हिन वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजमाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराण्या ऊसाच्या खुटाखुटावर उभ्या असतात असं त्यांनी म्हटले आहे.

गोटे यानां नक्की म्हणायचे काय ? कारण राजमाता आम्ही जिजाऊनां संबधतो आणि महाराणी आम्ही छत्रपती ताराराणीनां संबधतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या मराठा राजघराण्यांनी स्वताच्या प्राणांचे बलिदान दिले आज त्याच राजघराण्यातील महिलांबाबत इतके अवमानकारक वक्तव्य केले जातंय अशा वेळेस महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असतील सुमोटो कारवाई आता या अनिल गोटेंवर करणार का ? असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

मध्यंतरी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्यावेळी ग्रामीण म्हणीचा उपयोग केला त्यावेळेस त्यांच्या या म्हणीचा आणि वक्तव्याचा अतिशय मोठा अवडबंर माजवला गेला आणि त्यानां त्यांचे म्हणणे मागवले गेले, राजघराण्यातील महिलांबाबत इतके हिन दर्जाचे वक्तव्य केल्यानंतर अनिल गोटेंवर आता राष्ट्रवादी पक्ष किंवा राज्याचे गृहमंत्री व महिला आयोगाच्या अध्यक्षा काय कारवाई करणार हे तुम्ही आम्हाला सांगावे ! असा संतप्त सवाला भाजपा महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव ॲड वर्षा डहाळे यांनी केला आहे.