कॉर्डेलिया क्रूझ प्रकरण : विशेष चौकशी समितीच्या तपासात आले ‘हे’ धक्कादायक निष्कर्ष समोर

मुंबई – कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं (NCB) स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते, असा निष्कर्ष या समितीनं तपासाअंती दिला आहे. तसंच आर्यन खानचे कोणत्याही ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचंही एनसीबीच्या एसआयटीचं (NCB SIT) म्हणणं आहे.

या प्रकरणात एनसीबीने असं म्हटलं होतं की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे.

दरम्यान, या प्रकरणी बरेच आरोप- प्रत्यारोप देखील झाले होते यानंतर एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी म्हणजेच विशेष चौकशी समितीने चौकशीअंती हा निष्कर्ष काढला आहे. या संदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलं आहे.