Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पूलावर विचित्र अपघात, ट्रकची ८-९ वाहनांना धडक, गाड्या चक्काचूर

Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पूलावरुन गाडी चालवायची म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण या पूलावर आणि त्याच्या जवळपासच्या रस्त्यांवर अनेक विचित्र आणि भयानक अपघात घडत असतात. त्यामुळे नवले पूलाला अपघाताचा हॉट स्पॉट म्हणूनही ओळखले जाते. आज सकाळी नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. यात आठ ते नऊ वाहनं धडकली आहेत. या अपघातात वाहनांचं (Pune Navle Bridge Accident) मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे विचित्र अपघात घडला. आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. ट्रकच्या धडकेत अनेक महागड्या वाहनांचं नुकसान झालं आहे. सुझूकी, ह्युंडाई, रेनॉल्ट कंपनीच्या महागड्या कार मागच्या बाजूनं चक्काचूर झाला आहे. त्यासोबतच काही ट्रक आणि टेम्पोला देखील धडक बसली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?