मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

Devendra Fadnavis: शिवसेनेशी गद्दारी करत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाशी हात मिळवत मुख्यमंत्रीपद मिळवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) बऱ्याचशा घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिंदेच्या वाटेवर जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाजपात सामील होण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार अशी तिकडी कार्यरत असताना नव्या राजकीय भूकपांची चर्चा सुरू झाली आहे.

आज महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपच्या महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या मुलाने मोठा गुन्हा केला नाही, समाजासाठी…”, सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या मंगेश साबळेंच्या आईची विनंती

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर दिसणार बाल नागनाथांच्या भूमिकेत!

मोठी बातमी ! ड्रग्ज माफिया Lalit Patil प्रकरणात महिला पोलीस अधिकारी निलंबित