Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Ajit Pawar | गेल्या महिन्याभरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यात आधी आक्रमक झालेले विजय शिवतारे अचानक माघार घेऊन आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर करत सर्वकाही शांत झाल्याचाही मुद्दा आहे. मात्र, या मुद्द्यांवर अजूनही राजकीय वर्तुळात मात्र चर्चा चालूच आहे. यासंदर्भात अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले.

गेल्या महिन्यात चर्चेत आलेल्या विजय शिवतारेंच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. “विजय शिवतारे यांनी स्वतः शिंदे, देवेंद्र मी आणि विजयराव बसलो होतो. त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत व पिण्याचा पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे.असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत. ते काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोर मधला काही भाग आहेत. इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत. त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी, त्याविषयीची सोडवू नको व्हा,वी या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली. त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शब्द दिला की, तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित कराल त्यावेळेस येऊ. त्या पद्धतीने त्यांनी आज सभा तिथल्या ग्राउंड वर सभा आयोजित केलेली आहे.”, असे अजित पवार म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी विजय शिवतारेंना यादरम्यान कुणाकुणाचे फोन आले होते? असा सूचक प्रश्न केला असता अजित पवार त्यावर संतापले. “तुम्ही मला मूर्ख समजून नका? आंबेडकरांनी जे संविधान दिलेलंय त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे आणि तेवढच मी बोलेन.मला सांगायचं ते सांगितलं आहे.”, असे अजित पवार रागाने म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके