राज्यपालांची तिरकी चाल; विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुन्हा रखडणार

मुंबई : चालू अधिवेशनात (Budget Session) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) प्रयत्नशील आहे. मात्र, चालू अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी परत पाठवल्याने ही निवड पुन्हा लांबणीवर पडली आहे.

राज्यपाल मंजुरी देत नाहीत; तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेत्यांना (Congress) आज सांगितले. या प्रकरणामुळे राज्यपाल विरोध महाआघाडी असा संषर्घ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नसल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा सामना रंगण्याची शक्यता दिसत आहे.